MAHATMA GANDHI MISSION

Krishi Vigyan Kendra

(Indian Council of Agricultural Research, New Delhi)
Gandheli, Tq. Dist. Aurangabad (M.S.) 431007
Tel. 09404997772, Email: mgmkvk@gmail.com, Website: www.mgmkvk.com

एमजीएम हिल्स गांधेली येथे कृषि तंत्रज्ञान महोत्सव उत्साहात संपन्न

दि. २० सप्टेंबर २०१८ रोजी एमजीएम कृषि विज्ञान केंद्रामध्ये कृषि तंत्रज्ञान महोत्सवास सुरुवात झाली. उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख पाहुणे मा. श्री. उदय चौधरी,जिल्हाधिकारी, औरंगाबाद व मा. श्री. चिरंजीव प्रसाद,पोलीस आयुक्त, औरंगाबाद हे उपस्तीत होते. कार्यक्रमाकरिता मा. श्री. विजयअण्णा बोराडे, सचिव, मराठवाडा शेती सहाय्यक मंडळ, डॉ. एस.बी. पवार, सहयोगी संचालक, राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र औरंगाबाद, डॉ. टी. एस. मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद, डॉ.राजेंद्र रेड्डी, संचालक, एमजीएम हिल्स, गांधेली, डॉ.निलेश मस्के, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली हे मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एमजीएम चे सचिव मा. श्री. अंकुशराव कदम यांनी भूषिविले. तांत्रिक सत्रा मध्ये बांबू लागवड तंत्रज्ञान या विषयी मा. श्री. अजित भोसले,निवृत्त मुख्य वन संरक्षक, मा. श्री. दिपक खरे,व्यवस्थापक,आर्टीसन अग्रोटेक,जळगाव आणि मा.श्री.गणेश शिरोडे, व्यवस्थापक,सीएनजी प्रोडक्शन, पुणे यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवड विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


दि. २१ सप्टेंबर २०१८ रोजीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुदामअप्पा साळुंके, कृषिभूषण व मा. श्री. द्वारकाभाऊ पाथ्रीकर, अधक्ष्य,मित्रसाधना शिक्षण प्रसारक मंडळ,पाथ्री हे उपस्थित  होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एमजीएम हिल्स चे संचालक डॉ. राजेंद्र रेड्डी, यांनी भूषवले.


श्री.सुदाम आप्पा साळुंके यांनी अगदी मार्मिक शब्दात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, शेतकऱ्यांना आजच्या या जगाच्या स्पर्धेत आपणास राहायचे असेल तर फळ प्रक्रियेवर भर द्यावा. श्री. द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी आपल्या परखड शब्दात शेतकऱ्यांना सांगितले कि, शेतीत प्रामाणिकपणे कष्ट करा, व्यसनांपासून दूर राहा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करा.


डॉ.निलेश मस्के, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


सिताफळ लागवड तंत्रज्ञान या तांत्रिक सत्राचे प्रमुख वक्ते मा. श्री. डॉ.गोविंद मुंढे, प्रभारी अधिकारी, सीताफळ संशोधन केंद्र, आंबेजोगाई यांनी शेतकऱ्यांना सिताफळ लागवड तंत्रज्ञान विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


महोत्सवाच्या समारोप प्रसंगी डॉ.पी.एम.जाधव, उपाध्यक्ष एमजीएम ट्रस्ट यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, एमजीएम ट्रस्ट अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असून २००४ पासून कृषि शिक्षणाचे काम करत आहे. २०१३-१४ पासून कृषि विज्ञानं केंद्राची स्थापना फक्त शेतकऱ्यांच्या सेवेसाठी केली आहे. नवीन तंत्रज्ञान व शेतकऱ्यांचे अनुभव यांची सांगड घालून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास एमजीएम ट्रस्ट सदैव कार्यरत राहील असी ग्वाही दिली.   


यावेळी मोसंबी पीक व्यवस्थापनावर डॉ.एम.बि.पाटील, प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, औरंगाबाद यांनी रोपांची निवड, आंतरपिके, झाडाची छाटणी, बहार व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व सध्याच्या फळ गळती विषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.राजेंद्र बोरा, अधिष्ठाता, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद, डॉ.राजेंद्र रेड्डी, संचालक, एमजीएम हिल्स, गांधेली, श्री.दीपक गवळी, ता.कृ.अधिकारी, सिल्लोड, डॉ.ए.के.पांडे, प्राचार्य, नानासाहेब कदम कृषि महाविद्यालय, गांधेली, डॉ.काळे, प्राचार्य, एमजीएम, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, गांधेली व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.एन.एम.मस्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.क्षमा देशपांडे यांनी केले.


तांत्रिक सत्रानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला प्रात्यक्षिके, मुरघास प्रात्यक्षिक, मुक्त कुकुटपालन, विविध प्रकारचे चारा पिके, पानमळा, रोपवाटिका, मत्सपालन व कृषि प्रदर्शनाला भेट दिली.


कृषि तंत्रज्ञान महोत्सवास औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमजीएम नानासाहेब कदम कृषि महाविद्यालय, एमजीएम अन्नतंत्र महाविद्यालय, एमजीएम कृषि जैवतंत्रज्ञान महविद्यालये प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी तसेच एमजीएम कृषि विज्ञानं केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.